logo

नमस्कार
एक आनंदवर्तमान
Ace Holidays n Events ही संस्था लवकरच सुरेल नजराणा घेऊन आपल्यासारख्या रसिकांच्या भेटीला येत आहे . कला-संगीताच्या क्षेत्रातील आमचे हे पदार्पण आपल्या शुभेच्छांच्या पाठबळावर यशस्वी होईल असा आमचा विश्वास आहे.

कर्ण ही महाभारतातील एक आगळी व्यक्तिरेखा. शतकानुशतके प्रतिभावंताच्या आणि रसिकांच्या मनांना मोहिनी घालत आहे. अत्यंत भावोत्कट अशी ही जीवनकहाणी. मानवी जीवनाच्या विविध रंगांनी नटलेली. प्रसिध्द साहित्यिक, कवी श्री. विजय कुवळेकर यांनी समर्थ शब्दांतुन गीतरूपांत ही कर्णकथा साकार केली आहे.

अर्घ्य
स्वरगाथा सूर्यपुत्राची.
सूर्याला ' अर्घ्य ' देणाऱ्या सूतपुत्राची.

अर्घ्य आयुष्याचे स्नेहाला, शौर्याला, दातृत्वाला देणारी ही भावगाथा आहे. या मधुर गीतांना स्वरसाज चढविला आहे आजचे आघाडीचे व प्रतीभावान शास्त्रीय व सुगमसंगीत, संगीतकार श्री. रघुनंदन पणशीकर यांनी.

आपल्या असामान्य स्वराने रसिक मनांत मानाचे स्थान अल्पावधीत प्राप्त केलेले प्रतिभावंत शास्त्रीय व सुगमसंगीत गायिका सौ. मंजुषा पाटील आणि श्री. रघुनंदन पणशीकर यांचा बहारदार अविष्कार 'अर्घ्य' मध्ये आहे. त्याला साथ आहे दर्जेदार कलावंताची. अभिनय, निवेदन, वक्तृत्व अशा विविध क्षेत्रांमध्ये ठसा उमटविणारे व्यासंगी कलाकार श्री. राहुल सोलापूरकर यांचे निवेदन हि या संगीत रंगतीला लाभलेली रसपूर्ण जोड आहे. काव्य आणि संगीताची अशी ही एक वैशिष्टपूर्ण मैफल आहे.

शब्दांना, स्वरांना आणि भावनांना गुंफणारा हा दर्जेदार संगीताचा प्रयोग आहे. आपल्यासारख्या रसिकांचे आणि साहित्य-कला-संगीताच्या पाठीराख्यांचे बळ अशा अभिरुचीसंपन्न आविष्काराला लाभावे ही आमची नम्र विनंती आहे.

आमची वाटचाल यशस्वी करण्यासाठी ते फार मोलाचे आहे. त्याने आमची उमेद वाढेल, आणि कला-संगीत क्षेत्रात नवनवे प्रयोग व उपक्रम आम्ही सादर करीत राहू असा आमचा द्रुढ विश्वास आहे.

आपले सहकार्य लाभावे ही नम्र विनंती.

आपला विश्वासु
संदीप पाटील

bottom-logo