स्वप्नातले आजोळ प्रत्यक्षात !

सप्रेम नमस्कार ,

शीर्षक बघून थोडेसे आश्चर्यचकित झालात ना ? पण आज मी तुम्हाला माझा नव्या उपक्रमाविषयी थोडक्यात सांगणार आहे.

आजोळ - एक गोड भारतीय संकल्पना. आजोळ म्हटले कि आठवते मामाचे गाव, मामाचा चिरेबंद वाडा , अंगण, आजी आजोबांनी केलेले लाड, चापून चोपून खाल्लेला आमरस, मोकळ्या मैदानावर गावातल्या मित्रांबरोबर खेळलेले खेळ, नदीवर पोहणे आणि रात्र पडली की जेवणे उरकून अंगणात मारलेल्या भरपूर गप्पा, ऐकलेल्या गंमतीशीर गोष्टी, आजीने मायेने हात फिरवत, थोपटत म्हटलेली अंगाई, सर्वच कसे स्वप्नवत होते नाही ?

हळूहळू काळाच्या ओघात आणि शहरीकरणाच्या रेट्यात हे सर्व मागे पडले आणि उरला तो जगण्यात कृत्रिमपणा. सहन ही होत नाही आणि काही करताही येत नाही अशा विचित्र स्थितीतून आपल्यापैकी अनेक जण जात असतील.

पण म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग ...... माझा हा नवीन उपक्रम तुमच्या याच इच्छेवरचा रामबाण उपाय आहे, आणि तो म्हणजे तेच हरवलेले स्वप्नातले आजोळ परत आणणे. जिथे आजी आजोबा, नातवंडे, आणि अगदी पतवंडे सुध्दा एकत्र येऊन आपला वेळ मजेत जळावू शकतील. दोन्ही पिढ्यामधील चांगले संस्कार स्विकारुन एकत्र मजेत आणि सुखात नांदतील.

तर मग चला आजोळी जावू या !

आठवणीत राहणारी ...

आजी, आजोबांबरोबर नातवांची एक अनोखी सफर

सहलीचा दिनावर कार्यक्रम (सहलीची रूपरेषा)

दिवस १

दुपारी ३:००

प्रतिज्ञा मंगल कार्यालय (कर्वेनगर)
येथून शुभारंभ

संध्याकाळी ५ वाजता पोहचणे

चहा / नाष्टा झाल्यावर संध्याकाळी निवांत गप्पा, गोष्टी आणि मौज

रात्री ८:०० जेवण आणि मुक्काम

दिवस २

सकाळी ८:०० वाजता चाक / नाष्टा

९:०० ते १:०० विविध उपक्रम व खेळ / मौज / मजा / मस्ती

१:०० ते ३:०० दुपारचे जेवण आणि विश्रांती

३:०० ते ४:०० चहा / नाश्ता व नंतर पुण्याकडे प्रयाण

संध्याकाळी ६:०० वाजता प्रतिज्ञा मंगल कार्यालय, कर्वेनगर,
पुणे येथे पोहचणे व सहल समाप्त .

|| शुभं भवतु ||

 

Sandeep Patil
+91 90965 30904
aceholidaysnevents@gmail.com